भारतातील मुसलमान धर्मगुरूंनी अफगाणिस्तानमधील महिलांवरील अत्याचारांचा निषेध करावा ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांची मागणी
|
नवी देहली – भारतीय मुसलमान धर्मगुरूंनी अफगाणिस्तानातील स्त्रियांशी होणारे असभ्य वर्तन आणि अमानुष वर्तणूक यांचा निषेध करावा, अशी भारताच्या देशभक्त नागरिकांची अपेक्षा आहे. तालिबानी हे इस्लामी धर्मग्रंथांच्या आधारे त्यांच्या कृत्यांचे समर्थन करतात. जर ‘तालिबानी कृत्यांना धर्मग्रंथांचा आधार नाही’, असे भारतातील धर्मगुरूंना वाटत असेल, तर त्यांनी तालिबान्यांच्या अमानुषतेचा निषेध केला पाहिजे, अशी मागणी भाजपचे नेते आणि राज्यसभेतील खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी ट्वीट करून केली आहे.
Patriotic citizens of India expect Indian Muslim Clerics to protest against the uncivilized behaviour and brutality of treatment of women in Afghanistan. The Taliban quotes the Islamic scriptures to justify it. If Clerics deny that scriptures justify this, then they must protest.
— Subramanian Swamy (@Swamy39) October 5, 2021