श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी नवरात्रीच्या काळात घेतलेल्या भाववृद्धी सत्संगात ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शंकर नरुटे यांना आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे !
उद्या भाद्रपद अमावास्या (६.१०.२०२१) या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने…
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा उद्या, ६.१०.२०२१ या दिवशी वाढदिवस आहे. महर्षींनी सांगितल्याप्रमाणे त्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी आहेत. १७ ते २५.१०.२०२० या नवरात्रीच्या कालावधीत श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ऑनलाईन भाववृद्धी सत्संगात मार्गदर्शन केले. त्या वेळी ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शंकर नरुटे यांना आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. अनुभूती
अ. ‘१७.७.२०२० या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी भाववृद्धी सत्संगात मार्गदर्शन केले. या वेळी ‘सर्व देवींची रूपे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यामध्ये सामावली आहेत’, असे मला वाटत होते.
आ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई भाववृद्धी सत्संगात सांगत असल्याप्रमाणे ‘सर्व देवी आश्रमामध्ये प्रवेश करत आहेत’, असे मला जाणवत होते.
इ. माझ्या डोळ्यांसमोर सर्व देवींची रूपे येत होती. माझ्या डोळ्यांसमोर देवीची ५१ शक्तिपीठे येत होती, म्हणजे ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई प्रार्थना करून देवतांना आवाहन करून बोलावत आहेत’, असे मला जाणवत होते
ई. ‘देवी आम्हा सर्व साधकांवर कृपादृष्टी करत आहे’, असे दिसत होते.
उ. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ सर्व देवींना बोलावून साधकांचा उद्धार करण्याचे कार्य करायला प्रार्थनारूपी आवाहन करत आहेत’, असे वाटत होते. त्यामुळे प्रत्येक साधकाला देवीचे तत्त्व मिळत होते.
२. जाणवलेली सूत्रे
अ. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी देवतांना बोलावल्यावर देवता जलद गतीने येतात’, याची प्रचीती आली.
आ. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्या माध्यमातून देवता कार्य करत आहेत’, हेही लक्षात आले.
इ. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ देवतांची शक्ती कार्यान्वित करून समष्टीला लाभ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत; म्हणूनच समष्टीचा उद्धार लवकर होत आहे’, हेही लक्षात आले.
ई. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या हातून घडणारे प्रत्येक कार्य दैवी असते.
उ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ करत असलेल्या सेवेची फलनिष्पत्ती अधिक असते. त्यामुळे त्याचा लाभ समष्टीला अनेक पटींनी होतो.
ऊ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यज्ञात आहुती देतात. त्याचाही लाभ समष्टीला अनेक पटींनी होतो. त्या वेळी ‘देवतांना आवाहन केल्यावर त्या प्रत्यक्ष येऊन आहुती स्वीकारतात’, अशा अनुभूती अनेक साधकांना येतात.
ए. त्या भाववृद्धी सत्संगात बोलत असतांना त्यांच्या वाणीतील चैतन्यामुळे सर्व साधकांना दिशा मिळते आणि ते साधनेत पुढे जातात.
ऐ. ताईंच्या समष्टी कार्याचा वेग आणि समष्टीला ज्ञान देण्याचा वेग अनंत पटींनी असल्यामुळे सर्व देवता कार्यान्वित होऊन मोठे समष्टी कार्य घडत आहे’, याची सर्वांना प्रचीती येत आहे.
ओ. भगवंताने समष्टी कार्यासाठी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांची निवड केली आहे आणि भगवंत त्यांच्या माध्यमातून समष्टी घडवण्याची प्रक्रिया गतीने करत आहे.
औ. ‘आपण सर्व साधकांनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी दाखवलेल्या दिशेप्रमाणे वाटचाल केल्यास आपल्या सर्वांचाही उद्धार होणार आहे’, हे लक्षात घेऊन या ईश्वरी कार्यात तन, मन, धन अर्पण करून समर्पणभावाने समर्पित होऊया.
‘गुरुदेवा, आम्हाला हे दैवी समष्टी कार्य पहाण्याची, अनुभवण्याची श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या माध्यमातून दिशा दिली’, त्याबद्दल मी तुमच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’
– श्री. शंकर नरुटे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.१०.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |