झारखंडमध्ये मुसलमान विद्यार्थ्यांना नमाज पठणासाठी बिराजपूर विद्यालयाला सुट्टी !
|
जामताडा (झारखंड) – जिल्ह्यामध्ये १ ऑक्टोबर म्हणजे शुक्रवारी कोणतीही शासकीय संमती न घेता बिराजपूर विद्यालयातील मुसलमान विद्यार्थ्यांना नमाज पठणासाठी सुट्टी देण्यात आली. त्यामुळे परिसरामध्ये तणाव निर्माण झाला. याप्रकरणी जिल्हा शिक्षणाधिकारी अभय शंकर यांनी विद्यालय व्यवस्थापन संमितीला नोटीस पाठवली आहे. अजूनपर्यंत कुणावरही कारवाई करण्यात आली नाही. जामताडा जिल्ह्यातील नाला मतदारसंघातून निवडून आलेले सत्तारूढ झारखंड मुक्ती मोर्चाचे रवीद्रनाथ महतो हे झारखंड विधानसभेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याच आदेशाने झारखंड विधानसभमध्ये नमाज पठण करण्यासाठी स्वतंत्र खोली देण्याचे प्रस्तावित होते. (अशांचा भरणा असलेला पक्ष राज्यात सत्तेत असतांना त्या राज्याचे इस्लामीकरण झाल्यास आश्चर्य ते काय ? – संपादक) त्याला भाजपच्या आमदारांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे हा प्रस्ताव प्रलंबित आहे.
झारखंड के जामताड़ा में नमाज़ पढ़ने के लिए स्कूल बंद कराने के प्रकरण ने तूल पकड़ लिया है। भाजपा ने इस मामले में तीखी प्रतिक्रिया दी है।@STVRahul की रिपोर्ट https://t.co/sFSRrlnbqA
— ऑपइंडिया (@OpIndia_in) October 4, 2021
या विद्यालयामध्ये मुसलमान विद्यार्थी अधिक आहेत. विशेष म्हणजे जामताडा जिल्ह्यामध्ये अनुमाने ६ प्राथमिक आणि माध्यमिक उर्दू विद्यालये आहेत आणि या शाळांना रविवारऐवजी नमाज पठणाच्या दिवशी, म्हणजे शुक्रवारी सुट्टी देण्यात येते. याविषयी भाजपचे झारखंड अध्यक्ष दीपक प्रकाश म्हणाले, ‘‘अशा घटना केवळ १-२ जिल्ह्यापुरत्या मर्यादित नाहीत, तर संपूर्ण झारखंडमध्ये ही स्थिती आहे.’’ विश्व हिंदु परिषदचे अनुप राय म्हणाले, ‘‘विद्यालय व्यवस्थापन समितीच्या लोकांचा तालिबानी आदेशावर विश्वास आहे.’’