पेठवडगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील प्राचार्या डॉ. विजया रवींद्र चव्हाण यांना राज्यस्तरीय ‘राजमाता जिजाऊ पुरस्कार २०२१’ प्रदान !
कोल्हापूर, ४ ऑक्टोबर – पेठवडगाव येथील ‘श्री शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळ’ संचालित ‘श्री विजयसिंह यादव कला आणि विज्ञान महाविद्यालया’च्या प्राचार्या डॉ. विजया रवींद्र चव्हाण यांच्या शैक्षणिक कार्याची नोंद घेत ‘अविष्कार फाऊंडेशन’ यांच्या वतीने त्यांना ‘राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार २०२१’ प्रदान करण्यात आला. जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने देण्यात येणारा हा पुरस्कार ३० सप्टेंबर या दिवशी प्रदान करण्यात आला. या वेळी डॉ. विजया चव्हाण म्हणाल्या, ‘‘गेल्या ३० वर्षांपासून मी सहयोगी प्राध्यापक, साहाय्यक प्राध्यापकपदी कार्य केले असून आता प्राचार्य पदाचे दायित्व सांभाळत आहे. या संस्थेने हा पुरस्कार दिल्याविषयी मी त्यांचे आभार व्यक्त करते.’’