सिक्कीममध्ये १ जानेवारी २०२२ पासून प्लास्टिकच्या बाटलीत पाणी विकण्यावर बंदी
लहानशा सिक्कीम राज्याला जे करता येते, ते देशातील अन्य राज्यांना, तसेच केंद्र सरकारला का करता येत नाही, असा प्रश्न येथे उपस्थित होतो ! – संपादक
गंगटोक (सिक्कीम) – सिक्कीम सरकारने राज्यात प्लास्टिकच्या बाटलीत दिल्या जाणार्या पाण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १ जानेवारी २०२२ पासून या बाटल्यांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे. सिक्कीमच्या अनेक भागांत बांबूच्या बाटल्या वापरल्या जात आहेत. याविषयी राज्याचे मुख्यमंत्री पी.एस्. तमांग यांनी सांगितले की, राज्यात अनेक नैसर्गिक स्रोत आहेत जिथे ताजे आणि चांगल्या दर्जाचे पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.
Starting next year, there will be a state-wide ban on the use and sale of packaged mineral water. Travellers entering the state will not be allowed to carry the bottles with them.https://t.co/hzZyjWSkLV#sikkim #plasticpollution #Plastic #environmental #travel
— Outlook Traveller (@oltraveller) October 4, 2021