भारतीय सैनिकांनी वर्ष १९७१ च्या युद्धात मिळवलेल्या विजयाची जगाच्या इतिहासात नोंद !
पुणे – वर्ष १९७१ च्या युद्धात भारतीय सैनिकांनी शौर्य आणि पराक्रम गाजवत शत्रूला नामोहरम केले. या निर्णायक लढतीत पाकिस्तानच्या ९३ सहस्र सैनिकांनी आत्मसमर्पण केले. याची नोंद जगाच्या इतिहासात नोंदवली गेली, असे प्रतिपादन दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे.एस्. नैन यांनी केले. वर्ष १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धातील विजयाला आणि बांगलादेश निर्मितीला ५० वर्षे पूर्ण झाल्याने हे वर्ष ‘स्वर्णिम विजय वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येत आहे. यानिमित्त ‘विजय मशाल’ दक्षिण मुख्यालयाच्या क्षेत्रातून काढण्यात आली. या मशालीचे लेफ्टनंट जनरल जे.एस्. नैन यांनी पुणे येथे १ ऑक्टोबर या दिवशी स्वागत केले. ‘विजय मशाली’च्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या सोहळ्यासाठी माजी सैनिक तसेच बंगालचे उपउच्चायुक्त रहमान उपस्थित होते. पुण्यातील ‘विजय मशाली’च्या मुक्कामानंतर ३१ ऑक्टोबरला या मशालीचे नाशिकला प्रस्थान होणार आहे.