फ्रान्सच्या कॅथॉलिक चर्चमध्ये वर्ष १९५० पासून लहान मुलांचे शोषण करणारे पाद्य्रांसह सहस्रो लोक होते ! – चौकशी आयोगाचा अहवाल
|
पॅरिस (फ्रान्स) – फ्रान्सच्या कॅथॉलिक चर्चमध्ये वर्ष १९५० पासून लहान मुलांकडे वाईट दृष्टीने पहाणारे आणि त्यांचे शोषण करणारे सहस्रो लोक होते. यांत पाद्य्रांचाही समावेश होता. या संबंधी स्थापन करण्यात आलेल्या स्वतंत्र आयोगाचे प्रमुख जीन-मार्क सॉवे यांनी एक अहवाल घोषित करण्याच्या आधी प्रसारमाध्यमांना याविषयी माहिती दिली आहे. हा अहवाल २ सहस्र ५०० पानांचा आहे. त्यात गुन्हेगार आणि पीडित यांची संख्या यांविषयीची माहिती आहे. त्यात चर्चमधील आरोपी कशा प्रकारे सक्रीय होते, त्यासाठी कुणी चर्चच्या यंत्रणेचा कशा प्रकारे वापर केला, याचीही सविस्तर माहिती आहे. अहवालात ४५ प्रस्तावही दिले जाणार आहेत.
An independent commission examining church sex abuse in France believes that 3,000 child abusers — two-thirds of them priests — have worked in the church over the past 70 years.https://t.co/EbHw5ctaMP
— FOX26 News (@KMPHFOX26) October 4, 2021
१. सॉवे म्हणाले की, आयोगाने केलेल्या अन्वेषणामध्ये २ सहस्र ९०० लोक आणि चर्चचे इतर सदस्यही सक्रीय होते. वास्तविक ही संख्या अधिक असू शकते. म्हणजे शोषण करणार्यांची संख्या अधिक आहे.
२. कॅथॉलिक चर्चमधील लैंगिक शोषणाच्या घटनांत वाढ झाली होती. ती रोखण्यासाठी पोप फ्रान्सिस यांनी ऐतिहासिक उपाययोजना घोषित केली. त्यानुसार लैंगिक शोषणाच्या घटनांविषयी माहिती असलेल्या चर्चच्या कर्मचार्यांनी त्यांच्या वरिष्ठांना माहिती देणे बंधनकारक करण्यात आले होते. अशा प्रकारची आणखी माहिती समोर आली आहे.
३. फ्रेंच कॅथॉलिक चर्चद्वारे वर्ष २०१८ मध्ये स्वतंत्र आयोगाची स्थापना करण्यात आली. आयोगात २२ कायदेतज्ञ, डॉक्टर, इतिहासतज्ञ, समाजशास्त्रज्ञ, धर्मज्ञानी यांंचा समावेश करण्यात आला. वर्ष १९५० पासून पाद्य्रांनी केलेल्या लैंगिक शोषणाचे अन्वेषण करणे, असे या आयोगाचे काम होते. आयोगाने या संदर्भात अनेक साक्षी घेतल्या. दूरभाषद्वारेही अनेकांनी त्यांच्यावरील प्रसंगांची माहिती दिली.