आजपासून शाळा चालू होणार !
कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन
मालवण – राज्यातील बहुतांश शाळा गेले दीड वर्ष कोरोना महामारीमुळे बंद होत्या. आता कोरोना महामारी नियंत्रणात आली असल्याने शासनाने ४ ऑक्टोबरपासून शाळा चालू करण्यास अनुमती दिली आहे. त्यानुसार शहरी भागात इयत्ता ८ वी ते १२ वी, तर ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग चालू करण्यात येणार आहेत. या दिवशी सर्व शाळांमध्ये स्वागतोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी प्रशासनास दिलेल्या सूचनेनंतर शहरातील चालू होणार्या सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. शाळा चालू झाल्यानंतर शासनाने दिलेल्या कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन नगराध्यक्ष कांदळगावकर यांनीकेले आहे.