‘इतरांनी साधना करावी’, अशी तळमळ असणारे बार्शी, सोलापूर येथील श्री. महादेव लटके !
गुरुदेवांप्रती भाव असणारे बार्शी, सोलापूर येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. महादेव लटके (वय ७६ वर्षे) !
१. ‘श्री. लटकेबाबा नेहमी स्थिर, शांत आणि सतत घर अन् शेत यांतील कामांत व्यस्त असतात.’ – कु. दीपाली मतकर (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), सोलापूर
२. इतरांना साहाय्य करणे
अ. ‘एका साधकाची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. तेव्हा बाबांनी त्यांना शेतात काम दिले. नंतर बाबांनी त्या साधकाची साधना चांगली होण्यासाठी त्याला साहाय्य केले.
आ. ते इतरांना कौटुंबिक अडचणी सोडवायला साहाय्य करतात.
ई. ते मुलगा आणि सून यांना सेवेला जाण्यासाठी प्रोत्साहन देतात. ते नातवंडांना जेवण देणे आणि घर आवरणे, अशा सेवा करतात.
३. अपेक्षा नसणे
त्यांची कुटुंबातील व्यक्तींकडून कोणतीच अपेक्षा नसते. ते ‘घरातील व्यक्तींना कसे साहाय्य करता येईल ?’ या दृष्टीने प्रयत्नरत असतात.
४. ‘इतरांनी साधना करावी’, याची तळमळ
अ. ‘बाबांना आधी समाजकार्याची आवड होती. ते साधनेत आल्यावर त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ते साधना सांगतात. ‘प्रत्येकाने साधना करावी’, अशी त्यांची तळमळ असते.
आ. ते शेतात काम करण्यासाठी येणार्या व्यक्ती आणि त्यांची मुले यांना साधना सांगतात अन् त्यांच्याकडून साधना करवून घेतात. ते शेतात काम करणार्या व्यक्तींना ‘हिंदु राष्ट्र येणारच आहे’, असे सांगतात.
इ. ते नातेवाइकांना साधनेचे महत्त्व सांगतात आणि ‘त्यांनी साधना करावी’, यासाठी प्रयत्नरत असतात.
ई. ज्या व्यक्तींना सोलापूर येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेला जायचे असेल; पण त्यांची काही अडचण असेल, तर ती अडचण सोडवून हिंदु राष्ट्र-जागृती सभा पहाण्यासाठी पाठवतात.
उ. त्यांच्या सहवासात येणारी व्यक्ती जरी नास्तिक असली, तरी ‘ते त्यांना भगवंत आहे’, असे समजावून सांगतात आणि त्यांना साधनेसाठी प्रोत्साहन देतात.
५. भाव
अ. ते ‘गुरुदेवांची शेती आहे’, या भावाने शेतात काम करतात.
आ. ते सत्संगातील प्रार्थना आणि भावार्चना भावपूर्णरित्या ऐकतात.
इ. त्यांचा परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे. गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ आयोजित केलेला भावसोहळा पाहिल्यावर त्यांच्या डोळ्यांत भावाश्रू येत होते. ‘गुरुदेव आपल्यासाठी किती करतात ! प्रत्येक व्यक्तीत त्यांचे रूप पहायला हवे. आपण तसे केल्यास सतत आनंदी राहू’, असे त्यांना वाटते.’
– श्री. मनीष लटके (मुलगा) आणि सौ. वैशाली लटके (सून), बार्शी, सोलापूर. (२.६.२०२०)