‘जिझिया करा’चे नवे रूप म्हणजे ‘हलाल प्रमाणपत्र’ ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

भारतात इस्लामी बँकेचा प्रभाव अल्प होत आहे, हे पाहून अल्पसंख्यांकांकडून ‘हलाल इकॉनॉमी’ चालू करण्यात आली. तसेच ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्यासाठी खासगी संस्थांची निर्मिती करण्यात आली. एका उत्पादनाला हलाल प्रमाणपत्र देण्यासाठी भारतात सर्वसाधारणपणे वार्षिक शुल्क म्हणून २० सहस्र रुपये आकारले जातात. थोडक्यात ‘जिझिया करा’चे नवे रूप म्हणजे ‘हलाल प्रमाणपत्र’ ! पूर्वी इस्लामी राजवटीत एखाद्या हिंदूला इस्लाममध्ये धर्मांतर न करता हिंदूच रहायचे असेल, तर त्याला ‘जिझिया’ नावाचा कर भरावा लागत असे. त्याप्रमाणे सध्या मुसलमानांनी ‘तुमचे उत्पादन घ्यायचे असल्यास तुम्हाला हलाल प्रमाणपत्र घेण्यासाठी शुल्क भरावेच लागेल’, अशी स्थिती निर्माण केली आहे.