डॉ. आंबेडकरांच्या सिद्धांतानुसार देश चालला असता, तर आज भारत ‘हिंदु राष्ट्र’ असते ! – अजयसिंह सेंगर, प्रमुख, महाराणा प्रताप बटालियन
मुंबई – देशाच्या फाळणीच्या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहरू सरकारला ‘धर्माच्या आधारावर देशाची फाळणी करणार असाल, तर भारतात एकही मुसलमान रहाता कामा नये आणि पाकमध्ये एकही हिंदु रहाता कामा नये’, असे स्पष्टपणे सांगितले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या विचारावर नेहरू यांनी कृती केली असती, तर भारत ‘हिंदु राष्ट्र’ झाला असता, तसेच आतंकवादमुक्तही झाला असता, अशा आशयाचे प्रसिद्धीपत्रक महाराणा प्रताप बटालियनचे प्रमुख श्री. अजयसिंह सेंगर यांनी काढले आहे.
प्रसिद्धीपत्रकाद्वारे श्री. सेंगर म्हणाले, ‘‘डॉ. आंबेडकर यांचे विचार देशहितासाठी फार चांगले होते; मात्र नेहरू-गांधी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि सिद्धांत कचरापेटीत फेकून दिले. धर्माच्या आधारावर देशाची फाळणी झाल्यावर गांधी आणि नेहरू यांनी भारतात ४ कोटी मुसलमानांना राहू दिले. त्याचा परिणाम आज आपण भोगत आहोत. यासाठीच नथुराम गोडसे यांनी गांधी यांचा वध केला. गोडसे यांचे राष्ट्रप्रेम सर्वश्रेष्ठ होते. त्यामुळे त्यांना ‘भारतरत्न’ दिला पाहिजे.’’