श्री. विष्णुपंत जाधव यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाल्याच्या सत्कार सोहळ्यात साधकांनी व्यक्त केलेले मनोगत !
‘६.१०.२०२० या दिवशी श्री. विष्णुपंत जाधव यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याचे घोषित करण्यात आले. त्या वेळी साधकांनी व्यक्त केलेले मनोगत येथे दिले आहे.
१. ‘जाधवकाका ६ मास सेवेत नसले, तरी त्यांनी त्या कालावधीचा साधनेसाठी लाभ करून घेतला. आपत्काळ चालू झाला; म्हणून निराश न होता त्यांनी साधना करण्याची संधी घेतली.’
– श्री. घनश्याम गावडे आणि श्री. मेघराज पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२. ‘जाधवकाकांच्या बोलण्यात पालट झाल्याचे जाणवले.
काकांच्या बोलण्यात व्यापकत्व जाणवते. रामनाथी आश्रमात कोणतीही गाडी जाणार असल्यास त्यांनी त्या चारचाकीत केळी, पेरू, कलिंगड आदी फळांसह गोव्यात उपलब्ध न होणारी खते आदी साहित्य पाठवले. त्या वेळी त्यांनी अंतर, येणारा व्यय आदी गोष्टींचा अभ्यास केला. त्यामुळे त्यांच्यासह सेवा करतांना कोणताही ताण आला नाही.’ – श्री. शंकर नरुटे, सनातन आश्रम, रामनाथी.
३. ‘समष्टीशी अखंड अनुसंधान कसे ठेवायचे ?’, ते जाधवकाकांकडून शिकायला मिळाले.
४. ते म्हणाले, ‘‘साधनेत मी कुटुंबियांच्या मागे आहे.’’ यातून त्यांचा अहं अल्प असल्याचे जाणवते.
५. एका संतांच्या भेटीच्या वेळी जाधवकाकांकडे पाहून चांगले वाटत असल्याचे जाणवले होते. त्या वेळी ते संत म्हणाले, ‘‘केवळ चांगले वाटून उपयोगी नाही, तर त्यांच्यासारखे बनायला हवे.’
– कु. कृतिका खत्री, सनातन आश्रम, रामनाथी.
६. ‘जाधवकाकांचे बोलणे ऐकतांना भाव जागृत झाला.’
– श्री. घनश्याम गावडे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) आणि श्री. मेघराज पराडकर
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक: ६.१०.२०२०)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |