श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे अनमोल विचारधन
१. परात्पर गुरु डॉ. आठवले गुरु म्हणून लाभण्याचे महत्त्व
‘अध्यात्मातील तात्त्विक भागासमवेत प्रायोगिक भाग शिकवणारे गुरु मिळणे कलियुगात पुष्कळ दुर्मिळ आहे. असे गुरु (परात्पर गुरु डॉ. आठवले) आपल्याला लाभले आहेत’, हे आम्हा साधकांचे भाग्य आहे.
२. कलियुगात देवाने ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व साधने उपलब्ध करून दिली, तरी त्यांचा लाभ करून घेणे, हे साधकांच्या प्रयत्नांवर अवलंबून असणे
प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे साधकांना ‘आध्यात्मिक राजयोग’ लाभला आहे. जेथे भगवंताचे नाम घेणेही कठीण आहे, अशा कठीण कलियुगात देवाने साधकांना ‘गुरुकृपायोगा’च्या माध्यमातून साधना करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व साधने उपलब्ध करून दिली आहेत, हा ‘आध्यात्मिक राजयोग’च म्हणावा लागेल. याचा लाभ करून घेणे, हे साधकांच्या प्रयत्नांवर अवलंबून आहे.’
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना त्यांच्या देहामध्ये न अडकवता देवाकडे (तत्त्वाकडे) वाटचाल करण्याची शिकवण देणे
एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेत सनातनच्या काही संतांचा सत्संग होता. त्या वेळी एक संत परात्पर गुरुदेवांना म्हणाले, ‘‘प.पू. डॉक्टर, जे सर्व चांगले होत आहे, ते केवळ तुमच्या कृपेमुळेच होत आहे.’’ तेव्हा परात्पर गुरुदेवांनी सर्व संतांना सांगितले, ‘‘तुम्हीपण सर्व साधकांसारखेच म्हणू लागलात का ? आपल्याला साधकांना देवाकडे वळवायचे आहे. कोणा एका व्यक्तीच्या देहामध्ये अडकवायचे नाही.’’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (वर्ष २०२०)