दिखाऊपणाची धर्मनिरपेक्षता भारताला नष्ट करू शकते ! – केरळमधील बिशप जोसेफ कल्लारंगट
एका बिशपला जे कळते, ते तथाकथित निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांना का कळत नाही ? – संपादक
थिरूवनंतपूरम् (केरळ) – धर्मनिरपेक्षता भारताचे मूळ आहे; मात्र दिखाऊपणाची धर्मनिरपेक्षता भारताला नष्ट करू शकते. धर्मनिरपेक्षतेचा खरा लाभ कुणाला मिळतो, यावर आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत, अते मत केरळमधील सायरो-मलबार कॅथॉलिक चर्च पाला डॉयसीजचे बिशप जोसेफ कल्लारंगट यांनी मांडले आहे. चर्चशी संबंधित वर्तमानपत्र ‘दीपिका’मध्ये लिहिलेल्या एका लेखामध्ये त्यांनी हे मत मांडले. गेल्या मासामध्ये बिशप कल्लारंगट यांनी ‘केरळमधील ख्रिस्ती तरुणी ‘लव्ह जिहाद’ आणि ‘नार्कोटिक्स (अमली पदार्थ) जिहाद’ यांना बळी पडत आहेत’, असे म्हटले होते.
बिशप जोसेफ कल्लारंगट यांनी यात पुढे म्हटले आहे की,
१. जे लोक वाईट गोष्टींच्या विरोधात आवाज उठवत नाहीत, ते वास्तविक वाईट गोष्टींना प्रोत्साहनच देत आहेत. वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष न करता अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.
२. आपली राज्यघटना धर्मनिरपेक्षतेवर आधारित आहे. सर्व धार्मिक समुदाय आणि धर्मनिरपेक्ष समुदाय यांना एकत्र रहाण्यास शिकले पाहिजे. सर्व धर्मांचा सन्मान झाला पाहिजे.