लव्ह जिहाद आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेले अत्याचार या घटनांच्या बातम्या
धर्मांधाने राजा पंडित बनून विवाहित हिंदु महिलेला फसवले आणि पैशासाठी छळ केला
|
जे मोगल काळात चालू होते, तेच आताही चालू आहे. मोगलकाळ जाऊन लोकशाहीचा आधुनिक काळ आला आहे, तरीही ‘लव्ह जिहाद’पासून हिंदु अल्पवयीन मुली, तरुणी आणि विवाहित महिला यांची सुटका झाली नाही. हे लक्षात घेऊन ‘देशात महिलांनी पुष्कळ प्रगती केली’, असा टेंभा मिरवणार्यांनी आधी त्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे ! – संपादक
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील अमीन खान याने राजा पंडित बनून ३ मुलांची आई असलेल्या एका हिंदु महिलेला फसवले. त्यानंतर धर्मांतरासाठी तिच्यावर दबाव टाकला आणि पैैशासाठी छळ केला. धर्मांधाने बलपूर्वक शारीरिक संबंध निर्माण करून त्याचे चित्रीकरण केले, असा आरोप पीडितेने केला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी धर्मांधासमवेत त्याचे आई-वडील आणि भाऊ यांच्यावर गुन्हा नोंदवला असून त्यांना अटक केली आहे.
१. पीडिता तिचा पति आणि ३ मुले यांच्यासमवेत तेलंगाणामध्ये रहात होती. अमीन खान हा तिच्या पतीसाठी काम करत होता. मागील वर्षी पीडिता अमीनच्या संपर्कात आली. त्याने राजा पंडित या नावाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर पीडितेने तिच्या कुटुंबाला सोडून आरोपीसमवेत उत्तरप्रदेशातील इटावामध्ये पलायन केले. तथापि वास्तविकता समजल्यानंतर पीडितेने अमीन खान आणि त्याचे कुटुंबीय यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली.
२. पीडितेने तक्रारीमध्ये म्हटले की, उत्तरप्रदेशमध्ये गेल्यानंतर त्याने पीडितेला शांती कॉलनीमध्ये ठेवले. नंतर त्याच्या मसनाई गावात नेले. तेथे गेल्यानंतर तो मुसलमान असल्याचे पीडितेला समजले. काही दिवसांनी अमीनच्या कुटुंबियांनी पैशासाठी पीडितेचा छळ करणे चालू केले, तसेच धर्मांतर करण्यासाठी तिच्यावर दबाव निर्माण केला. या काळात अमीनने पीडितेशी बलपूर्वक शारीरिक संबंध निर्माण करून त्याची चित्रफित बनवली होती. पीडितेने धर्मांतराला विरोध केल्यावर त्याने ती चित्रफित सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली.
कागदपत्रांवर स्वाक्षर्या घेऊन पीडितेचे धर्मांतर
पीडितेने पुढे सांगितले की, अमीनने काही कागदपत्रांवर तिच्या स्वाक्षर्याही घेतल्या होत्या. ती कागदपत्रे तिला वाचता आली नाहीत. तिला नंतर समजले की, स्वाक्षर्या केल्यामुळ तिचे इस्लाममध्ये धर्मांतर झाले आहे. त्यानंतर अमीनने तिला बुरखा घालण्याची बळजोरी केली; परंतु तिने हिंदु असल्याचे सांगून बुरखा घालण्यास विरोध केला. त्यामुळे त्याच्या कुटुंबाला राग आला.
गुन्हा नोंदवण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे पीडितेला साहाय्य
‘नारायणी सेने’चे कार्यकर्ते अनुराग पुरोहित यांनी पीडितेला न्यायालयाच्या बाहेर रडत असतांना पाहिले. त्यानंतर नारायण सेनेने आरोपीवर गुन्हा नोंदवण्यासाठी तिला साहाय्य केले. त्यांनी तिच्या तेलंगाणामधील कुटुंबाला याची माहिती दिली आहे. ‘पीडितेचे कुटुंब तिला नेण्यासाठी येईपर्यंत नारायणी सेना तिची काळजी घेईल’, असे सेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
सूरतमध्ये पैसे घेऊन धर्मांतर होत असल्याचे उघड !
बांगलादेशी घुसखोरांचे आधारकार्ड बनवले हिंदु नावाने !
शहरात पैसे घेऊन धर्मांतर चालू असतांना प्रशासन आणि गुप्तचर विभाग झोपा काढत आहे का ? जे एका पत्रकाराला दिसते, ते सहस्रो रुपये वेतन घेणार्या गुप्तचर विभागाच्या कर्मचार्यांना कसे दिसत नाही ? असेच प्रकार देशाच्या अन्य भागातही होत असल्याची शक्यता लक्षात घेता सरकार यावर काय कारवाई करणार आहे ? – संपादक
सूरत (गुजरात) – येथे केंद्र सरकारच्या ‘युनिक आयडी आधार पोर्टल’मध्ये फेरफार करून मोठ्या प्रमाणात धर्मांतर चालू आहे. कोणत्याही वैध कागदपत्रांच्या आधारे आधारकार्डमध्ये सुधारणा करून व्यक्तीचे नाव, लिंग, जात आणि धर्मही पालटला जात आहे. अलीकडेच एका मुलीने आधारकार्डमध्ये धर्मांतर करून दुसर्या धर्मातील युवकाशी लग्न केल्याचे उघड झाले आहे.
१. दैनिक ‘भास्कर’ने दिलेल्या माहितीनुसार धर्मांतराचा हा खेळ केंद्र सरकारच्या एका अधिकृत आधारकेंद्रावर चालू असल्याचे आढळून आले आहे. तेथे खासदार, आमदार आणि नगरसेवक यांच्या ‘लेटरपॅड’वर एक आवेदन लिहून आधारकार्डमध्ये पालट करण्यात येत आहे. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हिंदूला ‘मुसलमान’ आणि मुसलमानाला ‘हिंदु’ करण्यात येत आहे.
२. ही टोळी बांगलादेशी घुसखोर आणि बंगालमधून येणार्या अल्पसंख्यांकांना हिंदु नावाने आधारकार्ड बनवून देत आहे.
३. दैनिक ‘भास्कर’च्या एका पत्रकाराने आधारकार्ड सेंटरच्या संचालकाला एजाज या मुसलमान युवकाच्या आधारकार्डची प्रत पाठवून त्याचे हिंदु नावाने आधारकार्ड बनवण्यास सांगितले. संचालकाने ३ सहस्र रुपयांच्या बोलीवर एजाजचे आधारकार्ड अजय या हिंदु नावाने बनवून देण्याचे मान्य केले. या वेळी त्याने ‘प्रथम वर्ग अधिकार्याच्या ‘लेटरहेड’ची व्यवस्था स्वत:च करतो’, असे सांगितले.
४. सूरतमधील ‘युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया’चे व्यवस्थापक प्रदीप पटनायक यांच्या मते राजपत्राविना कोणतेही धर्मांतर होऊ शकत नाही. हे धर्मांतर अवैध आहे आणि तसे करणे गुन्हा आहे.
५. एका अधिवक्त्याच्या मते आधारकार्डवर धर्म पालटायचा असेल, तर जिल्हाधिकार्यांची संमती आवश्यक आहे. सूरतचे जिल्हाधिकारी आयुष ओक म्हणाले, ‘‘असे प्रकरण तुमच्याकडे असल्यास आम्हाला द्या. आम्ही त्यावर कारवाई करतो.’’
६. सध्या गुजरात उच्च न्यायालयाने काही कारणास्तव धर्मांतरासाठी जिल्हाधिकार्यांकडून घेतल्या जाणार्या सर्व प्रकारच्या अनुमतींवर स्थगिती दिली आहे.
कोझिकोडमध्ये महिलेवर ४ धर्मांधांचा सामूहिक बलात्कार
‘लव्ह जिहाद’ च्या विरोधात कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत यात अशाच प्रकारे महिलांचा बळी जात रहातील. त्यामुळे समस्त महिलांनी संघटितपणे आवाज उठवावा आणि या विरोधात कठोर कायदा करण्यासाठी केंद्र सरकारला भाग पाडावे ! – संपादक
कोझिकोड (केरळ) – येथे कोल्लम गावातील एका ३२ वर्षीय महिलेवर तिच्या धर्मांध मित्रासमवेत ३ जणांनी सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी अजनाज, फहद, निजाज आणि सुहैब यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे २ वर्षांपूर्वी ‘टिकटॉक’ या ‘ॲप’च्या माध्यमातून अजनाज या धर्मांधाशी पीडितेची ओळख झाली. त्याने बोलावल्यामुळे पीडिता कोझिकोड येथे गेली होती. त्यानंतर तिला अजनाज आणि त्याचा मित्र फहद शहराबाहेरील चेवयूर येथील एका सदनिकेत घेऊन गेले. प्रथम अजनाज याने बलात्कार केला. त्यानंतर त्याने अन्य आरोपींना बोलावले. त्यांनी तिला बळजोरीने मद्य आणि अमली पदार्थ खाण्यास भाग पाडले अन् सामूहिक बलात्कार केला. या बलात्काराचे धर्मांधांनी भ्रमणभाषमध्ये चित्रीकरणही केले. या निर्घृण कृत्यामुळे पीडिता बेशुद्ध पडली. त्यानंतर धर्मांधांनी तिला एका खासगी रुग्णालयामध्ये सोडून पळ काढला. पीडितेने शुद्धीवर आल्यावर घटनेची माहिती रुग्णालयाच्या कर्मचार्यांना दिली आणि त्यांनी पोलिसांना कळवले.
विवाह ठरलेली हिंदु युवती सोन्याचे दागिने आणि पैसे घेऊन धर्मांध प्रियकरासमवेत पसार !
लव्ह जिहादच्या अशा घटना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही ! – संपादक
बेंगळुरू (कर्नाटक) – विवाह ठरलेली एक २१ वर्षीय हिंदु युवती घरातील सोन्याचे दागिने, तसेच रोख रक्कम घेऊन तिच्या धर्मांध प्रियकरासमवेत पसार झाल्याच्या प्रकरणी बर्के पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. राज्यातील गदगमधील गांधीनगरमध्ये ही घटना घडली आहे.
विवाह ठरल्यामुळे वर पक्षाकडून १ लाख रुपयांचा सोन्याचा हार, ५० सहस्र रुपयांची सोन्याची अंगठी, कानातील आणि चांदीचे पैंजण त्या युवतीला देण्यात आले होते. पळून जातांना युवतीने वरील सर्व दागिने आणि रक्कम नेली, तसेच तिने बँकेतील ९० सहस्र रुपये अकबर अली नावाच्या खात्यात हस्तांतरित केले.