वणी (यवतमाळ) येथील ‘बेटी फाऊंडेशन’चा बाळ विक्रीचा डाव उधळला !
बेटी फाऊंडेशनच्या पदाधिकार्यांसमवेत ६ आरोपींना अटक
समाजाची नैतिकता खालावत असल्याचेच हे उदाहरण ! – संपादक
वणी (यवतमाळ), २ ऑक्टोबर (वार्ता.) – येथील ‘बेटी फाऊंडेशन’ने ‘बाळ दत्तक देण्यासाठी उपलब्ध’ असा संदेश समाजमाध्यमांतून देऊन बाळविक्रीचा डाव रचला; मात्र अकोल्याच्या बाल कल्याण समिती अध्यक्ष पल्लवी कुळकर्णी यांनी संदेशातील संपर्क क्रमांकावर वेळीच संपर्क केला. त्यामुळे हा डाव उधळला गेला. त्यांनी बाल कल्याण समितीशी संपर्क केला. या प्रकरणी बेटी फाऊंडेशनच्या पदाधिकार्यांसमवेत ६ आरोपींना अटक करण्यात आली.