आतापर्यंतच्या सत्ताधार्यांनी गोमंतकियांना पोर्तुगिजांच्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर का काढले नाही ?
‘१९ डिसेंबर १९६१ या दिवशी भारतीय सैन्याने गोवा मुक्त केला. आपण सर्व स्वतःलाच आधी एक प्रश्न विचारू आणि त्याचे प्रामाणिक उत्तर शोधू. (यासंदर्भातील ५ आणि ६ ही सूत्रे आपण २६.९.२०२१ या दिवशीच्या अंकात पाहिली. आज त्यापुढील सूत्रे पाहूया.)
७. गोवा मुक्त झाला, तरी मये गावाला मुक्ती मिळालेली नाही. तेथील भूमी अजूनही ग्रामस्थांच्या नावावर नाहीत. प्रत्येक निवडणुकीत या भूमी ग्रामस्थांच्या नावावर करण्याविषयी राजकारण्यांकडून वचने आणि घोषणा दिल्या जातात; पण प्रश्न अजून सुटलेला नाही.
८. कुंकळ्ळीच्या पोर्तुगिजांविरुद्धच्या प्रेरक स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याची इच्छाशक्तीच सरकारला नाही. केवळ आश्वासने देऊन फसवण्यात येत आहे !
(क्रमशः पुढील रविवारी)
– प्रा. सुभाष वेलिंगकर, ‘भारतमाता की जय’ संघटना, गोवा.