शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांचे मंदिर ७ ऑक्टोबरपासून दर्शनासाठी होणार खुले !
दर्शनासाठी प्रतिदिन ९ ‘ऑनलाईन’ पास देण्यात येणार !
बुलढाणा – कोरोनाचा संसर्ग अल्प झाल्याने राज्यशासनाने मंदिरांसह धार्मिक स्थळे खुली करण्याचा निर्णय घोषित केला आहे. शासनाने निर्देशित केलेले उपाय आणि मार्गदर्शक सूचना यांनुसार ७ ऑक्टोबरपासून ‘विदर्भाची पंढरी’ म्हणून प्रसिद्ध असलेले श्री संत गजानन महाराजांचे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. नागरिकांना ‘ई-पास’द्वारे ‘श्रीं’चे दर्शन घ्यावे लागणार आहे. ‘मंदिरात भाविकांनी गर्दी करू नये, तसेच दर्शनासाठी येत असतांना शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे’, असे आवाहन मंदिर संस्थानकडून करण्यात आले आहे.
श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी प्रतिदिन ९ ‘ऑनलाईन’ पास देण्यात येणार असून हे पास संस्थेच्या अधिकृत ‘www.gajananmaharaj.org’ या संकेतस्थळावरून आपल्या किंवा दुसर्यांचा भ्रमणभाषसंच, ‘इंटरनेट कॅफे’ अन् सेतू यांद्वारे उपलब्ध करून घेता येईल.