भाग्यनगरमध्ये मुसलमान मुलींशी मैत्री ठेवणार्या हिंदु मुलाला धर्मांधांकडून मारहाण
मुसलमान मुलींशी हिंदु मुलाने मैत्री केल्यानंतर त्याला मारणार्या धर्मांधांचा उद्दामपणा जाणा !
हिंदु मुुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर घडवून आणणार्या धर्मांधांच्या ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणांना ‘प्रेमा’चे गोंडस नाव देणारा आणि त्यास विरोध करणार्या हिंदूंना ‘सांप्रदायिक’ ठरवणारा पुरो(अधो)गामी चमू हा मुसलमान मुलीशी मैत्री करणार्या हिंदु मुलांना मारहाण होत असतांना गप्प बसतो, हे लक्षात घ्या ! – संपादक
भाग्यनगर (तेलंगण) – येथे मुसलमान मुलींशी मैत्री ठेवणार्या हिंदु मुलांना मोठ्या प्रमाणात लक्ष्य करण्यात येत आहे. मागील १५ दिवसांमध्ये मुसलमान मुलींसमवेत फिरणार्या हिंदु मुलांवरील आक्रमणाच्या ५ घटना समोर आल्या आहेत. दुचाकीवरून मुसलमान महिलेसमवेत फिरणार्या एका हिंदु युवकाला नुकतीच मारहाण करण्यात आली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
तेलंगणमध्ये अशा प्रकारच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. यापूर्वी तेलंगणच्या इंदूर (निझामाबाद) येथेही अशाच एका प्रकरणात एका मुसलमान मुलीसमवेत फिरणार्या हिंदु युवकाला धर्माधांच्या जमावाने मारहाण केली होती. अलीकडे बेंगळुरू येथेही मुसलमान युवतीसमवेत फिरणार्या एका हिंदु युवकाला धर्मांध जमावाने धमकी दिली, तसेच त्याला मारहाण केली होती.