सततच्या बदलीमुळे त्रस्त पोलीस अधिकार्‍याची आत्मदहनाची चेतावणी !

पोलीसच आत्मदहनाची भाषा करायला लागले, तर ते जनतेचे रक्षण कसे करणार ? वरिष्ठ अधिकार्‍यांनी पोलिसांचे मनोबल उंचावण्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. वारंवार बदल्या करण्याची आवश्यकताही तपासून पहायला हवी.

पुणे – संबंधित पोलीस अधिकार्‍याची प्रशासकीय कारणामुळे दोन ते तीन वेळा बदली करण्यात आली. त्यामुळे त्रस्त झालेल्या अधिकार्‍याने पोलीस नियंत्रण कक्षाला दूरभाष करून आत्मदहन करणार असल्याचे सांगितले. नियंत्रण कक्षाने ही माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना दिल्याने अधिकार्‍यांनी त्यांचे समुपदेशन केले, तसेच असा प्रकार पुन्हा न करण्याची ताकीद दिली. त्याचसमवेत संबंधित अधिकार्‍यांना नोटीसही बजावली आहे.