श्री अंबाबाई मंदिरातील ६७ वा ‘श्री अंबाबाई संगीत महोत्सव’

७ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाईन प्रणालीद्वारे होणार !

मिरज, १ ऑक्टोबर (वार्ता.) – श्री अंबाबाई मंदिरात गेली ६६ वर्षे श्री अंबाबाई नवरात्र महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा ६७ वा श्री अंबाबाई संगीत महोत्सव ७ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाईन प्रणालीद्वारे होणार आहे. या कालावधीत होणारे कार्यक्रम प्रतिदिन रात्री ७ ते ९ या वेळेत राघवेंद्र स्वामी मठ, श्री अंबाबाई मंदिर येथे ध्वनीमुद्रित केले जातील आणि फेसबूक, तसेच ‘यू ट्यूब’ यांद्वारे प्रसारित करण्यात येणार आहेत, अशी माहिती श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव मंडळाचे अध्यक्ष मधुभाऊ पाटील (मळणगावकर) यांनी दिली आहे.

७ ऑक्टोबरला सांगली येथील मंगला जोशी यांच्या हस्ते संगीत महोत्सवाचे उद्घाटन होईल. ९ ऑक्टोबर या दिवशी ‘डॉ. अबन मेस्त्री’ पुरस्कार कोल्हापूर येथील महेश देसाई यांना प्रदान करण्यात येणार आहे. १४ ऑक्टोबर या दिवशी कौस्तुभ देशपांडे यांच्या ‘आनंदतरंग’ कार्यक्रमाद्वारे महोत्सवाची सांगता होईल.