पुण्यात पोलीस अधिकार्याकडून तरुणीवर बलात्कार !
|
पुणे – पुण्यात वाहतूक पोलीस शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने एका तरुणीला लग्नाचे आमीष दाखवत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. प्रवीण जर्दे असे या पोलीस अधिकार्याचे नाव आहे. वर्ष २०१८ मध्ये जर्दे जेव्हा कोथरूड पोलीस ठाण्यात कार्यरत होते, तेव्हा तेथे तक्रार करण्यासाठी आलेल्या या तरुणीशी त्यांची ओळख झाली. त्यातून त्यांचे संपर्क वाढत गेले आणि नंतर जर्दे यांनी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.
मी पोलीस अधिकारी आहे, तुझे तुकडे तुकडे करून तुला संपवून टाकीन ! – पोलीस अधिकार्याकडून तरुणीला धमकी
जर्दे यांनी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्यानंतर तरुणीने जर्दे यांच्याकडे लग्नाविषयी विचारणा केली. त्या वेळी जर्दे यांनी तरुणीला ‘मी पोलीस अधिकारी आहे. तुझे तुकडे तुकडे करून तुला संपवून टाकीन. कुणीही माझे काहीही वाकडे करू शकत नाही. मी सर्व ‘मॅनेज’ करीन’, अशी धमकी देत तरुणीला मारहाणही केली. (वर्दीचा माज चढलेले असे पोलीस निष्पाप जनतेला गुन्हेगारांप्रमाणेच वागणूक देणार, यात शंकाच नाही ! – संपादक) पीडित तरुणीने घडलेला सर्व प्रकार सांगितल्यानंतर आरोपी जर्दे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.