बालकांच्या लसीकरणाविषयी केंद्राने लवकरात लवकर निर्देश द्यावेत ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री
पुणे – राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून चालू करण्याचा निर्णय झाला आहे; मात्र पालकांची आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याची मानसिकता दिसत नाही. दिवाळीनंतर पालक मुलांना शाळेत पाठवण्यास सिद्ध आहेत. लहान मुलांच्या लसीविषयी जोपर्यत केंद्राच्या पातळीवर निर्णय होत नाही, तोपर्यंत आपण काही करू शकत नाही. केंद्र सरकारने लहान मुलांच्या लसीकरणाविषयी लवकरात लवकर कळवावे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ते पुण्यामध्ये कोरोना संसर्ग स्थितीचा आढावा घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.