निवडणूक प्रचारात अधिकची रक्कम व्यय केल्यामुळे फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींना शिक्षा !
भारताने फ्रान्सचा आदर्श घेऊन निवडणूक प्रचारात अधिक रक्कम खर्च करणार्यांना शिक्षा द्यावी !
पॅरिस (फ्रान्स) – निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिकची रक्कम निवडणुकीत व्यय केल्याच्या प्रकरणी फ्रान्सचे माजी राष्ट्रपती निकोलस सर्कोझी यांना न्यायालयाने १ वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे. वर्ष २०२१ मध्ये त्यांनी निवडणुकीत अधिक रक्कम खर्च केली होती. सर्कोझी हे या निर्णयाच्या विरोधात वरच्या न्यायालयात याचिका प्रविष्ट करू शकतात. त्यांना घरीच नजरबंद केले आहे. त्यांच्या हातामध्ये इलेक्ट्रॉनिक ‘ब्रेसलेट’ (मनगटात घालण्याचे एक प्रकारचे कडे) घातले आहे. याद्वारे सर्कोझी कुठे आहेत ?, ते कुणा कुणाला भेटतात ?, यांसह अन्य माहिती पोलिसांना मिळते. त्यामुळे ते कुठेही जाऊ शकत नाहीत.