अदानी आस्थापनाला श्रीलंकेत ‘कंटेनर टर्मिनल’ (साहित्य साठवण्यासाठीचे मोठे केंद्र) उभारण्याचे कंत्राट
चीनकडून उभारण्यात येणार्या बंदराच्या जवळच ‘टर्मिनल’ असणार !
कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेतील समुद्रात ‘कंटेनर टर्मिनल’ (साहित्य साठवण्यासाठीचे मोठे केंद्र) उभारण्याचे कंत्राट भारतातील अदानी आस्थापनाला मिळाले आहे. श्रीलंकेच्या ‘द श्रीलंका पोर्ट्स अथॉरिटी’कडून याविषयीचा करार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे चीन सध्या श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे बंदर बांधत आहे. त्यापासून जवळच हे ‘टर्मिनल’ उभारण्यात येणार आहे. अदानी आस्थापन हे स्थानिक आस्थापन ‘जॉन कील्स’ समवेत काम करून सदर ‘टर्मिनल’ उभारणार आहे.
India gets strategic foothold in Sri Lanka port sector with Adani’s $700-million WCT dealhttps://t.co/g0rTyOZ73K
— TIMES NOW (@TimesNow) October 1, 2021