पेशावर (पाकिस्तान) येथे शीख डॉक्टरची गोळ्या घालून हत्या
पाकच्या समर्थनातून भारतात आतंकवादी कारवाया करणारे खलिस्तानी यावर का तोंड उघडत नाहीत ? कि पाकमध्ये शिखांचा वंशसंहार होणे त्यांना मान्य आहे ? – संपादक
पेशावर (पाकिस्तान) – येथे अज्ञात आक्रमणकर्त्यांनी शीख समुदायातील युनानी डॉक्टर सरदार सतनाम सिंह (खालसा) यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. सिंह यांच्यावर ४ गोळ्या झाडण्यात आल्या. डॉ. सिंह हे हसनदल येथे वास्तव्य करत होते. शहरात ते एक धर्मादाय चिकित्सालयही चालवत होते. (‘युनानी’ नावाची वैद्यकीय उपचार पद्धती ही अरबी-इराणी पद्धत असून तिचा वापर प्रामुख्याने मुसलमान देशांमध्ये करण्यात येतो.)
Pakistan: Prominent Sikh community member shot dead outside his Dawakhana in Peshawarhttps://t.co/w5Yct8lg0i
— OpIndia.com (@OpIndia_com) September 30, 2021