श्रेयवादातून सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचे २ वेळा लोकार्पण
सावंतवाडी – राज्यशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून तालुक्यातील सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे भाजप आणि शिवसेना या पक्षाच्या पदाधिकार्यांनी स्वतंत्रपणे लोकार्पण केले. या दोन्ही लोकार्पण सोहळ्याला मात्र प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी आणि कर्मचारी यांना उपस्थित रहावे लागले. श्रेयवादातून एकाच रुग्णवाहिकेचे २ वेळा लोकार्पण करण्यात आल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.
भाजपच्या वतीने २९ सप्टेंबरला गिरिजानाथ मंदिर येथे जिल्हा परिषदेच्या माजी महिला आणि बालकल्याण समिती सभापती तथा विद्यमान सदस्य पल्लवी राऊळ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले, तर ३० सप्टेंबरला सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्राकडे शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.