गुरूंच्या आशीर्वादाचे फलित !

ग्रंथांसाठीचे ५० टक्के लिखाण आतून स्फुरणे 

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘माझे गुरु प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांनी मला आशीर्वाद दिला होता की, ‘तू किताबोंके उपर किताबे लिखेगा’. त्यांच्या या आशीर्वादाचा परिणाम म्हणून मी वर्ष १९८७ पासून सप्टेंबर २०२१ पर्यंत २६९ ग्रंथांचे संकलन केले. सप्टेंबर २०२१ पर्यंत सनातन संस्थेने या ग्रंथांसह एकूण ३४७ ग्रंथांच्या १७ भाषांतील ८२ लाख ४८ सहस्र प्रती प्रकाशित केल्या आहेत. अजून ५००० ग्रंथ प्रकाशित होतील, इतके लिखाण गोळा केलेले आहे. या सर्व ग्रंथांचे वैशिष्ट्य म्हणजे यांतील ५० टक्के लिखाण हे इतरांचे लेख, साधकांना मिळालेले ईश्वरी ज्ञान इत्यादींच्या माध्यमातून गोळा झालेले आहे, तर उरलेले ५० टक्के लिखाण मला प.पू. बाबांच्या आशीर्वादामुळे आतून स्फुरलेले आहे !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (४.९.२०२१)


प्रकृतीनुसार साधनेच्या संदर्भात असणारे व्यक्तींचे परस्परविरोधी विचार !

विचार १. ‘प्रकृती सुधारली की, आपल्याला साधना करता येते.

विचार २. साधना केली, तर आपली प्रकृती सुधारते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१६.९.२०२१)