सतत आनंदी रहाणारे आणि इतरांना आनंद देणारे पू. (कै.) वैद्य विनय भावेकाका !

रामनाथी आश्रमातील साधक श्री. मधुसूदन कुलकर्णी यांना पू. वैद्य भावेकाका यांचे लक्षात आलेले गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

पू. वैद्य विनय भावे

१. सतत दुसर्‍यांना आनंद देणारे पू. वैद्य भावेकाका !

पू. वैद्य भावेकाका यांची आठवण येताच माझ्या डोळ्यांसमोर त्यांचा सतत आनंदी तोंडवळा आणि निरागस रूप येते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘इतरांना सतत आनंद देण्यासाठीच पू. भावेकाकांना संत बनवले आहे’, असे मला वाटायचे.

२. अस्वस्थ वाटत असतांना पू. भावेकाका यांच्याशी बोलल्यानंतर उत्साही वाटणे

काही वेळा मला होणार्‍या त्रासामुळे माझ्यावर त्रासदायक शक्तीचे आवरण येऊन मला अस्वस्थ वाटत असे. त्या वेळी मी पू. भावेकाका यांच्याशी बोलायचो. पू. काकांशी बोलल्यानंतर त्यांच्या वाणीतून बाहेर पडणार्‍या शब्दांतील चैतन्यामुळे माझ्यावरील आवरण जाऊन मला उत्साही वाटायचे आणि त्यानंतर माझी सेवा चांगल्या पद्धतीने होत असे.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि पू. वैद्य भावेकाका यांच्यातील साम्य दर्शवणार्‍या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

श्री. मधुसूदन कुलकर्णी

३ अ. पू. वैद्य भावेकाका यांचे गुण आठवल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आठवण होऊन भावजागृती होणे : मितभाषी, दुसर्‍याला न दुखावणे, विचारलेल्या प्रश्नांना समर्पक आणि नम्र भाषेत उत्तर देणे, दुसर्‍याला आपलेसे करून घेणे, हे पू. भावेकाका यांच्यामधील गुण आठवल्यावर मला परात्पर गुरु डॉक्टरांची आठवण होते आणि माझी भावजागृती होते. ‘पू. भावेकाका आपल्यातून गेले आहेत’, असे मला वाटतच नाही; कारण त्यांच्या संदर्भात लिहितांना मी पू. भावेकाकांशीच बोलत आहे’, असे मला वाटले.

३ आ. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांची आठवण आल्यास पू. वैद्य भावेकाका यांना भेटल्यावर ‘परात्पर गुरु डॉक्टरांनाच भेटत आहे’, असे वाटणे : काही वेळा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आठवण यायची. तेव्हा मी पू. भावेकाकांना जाऊन भेटत असे. ‘पू. काकांना भेटतांना मला ‘मी परात्पर गुरु डॉक्टरांनाच भेटत आहे’, असे वाटायचे. त्यामुळे मला भावस्थितीत रहाता येऊन पुष्कळ आनंद मिळायचा.

३ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातनचे संत यांच्यामधील साम्य म्हणजे निरपेक्ष प्रेम : परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांनी घडवलेल्या सनातनच्या सर्व संतांमध्ये एक साम्य आहे, ते म्हणजे निरपेक्ष प्रेम (प्रीती). साधकांच्या अडचणी ओळखून त्या सोडवणे आणि साधकांना उपाय सांगून त्यांना साधना करण्यासाठी प्रोत्साहित करणे. परात्पर गुरु डॉक्टरांनीच ही शिकवण सनातनच्या सर्व संतांना दिली आहे.

परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेनेच मला हे सर्व लिहिता आले; म्हणून मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’- श्री. मधुसूदन कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.७.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक