ब्रिटनमध्ये पेट्रोलच्या प्रचंड टंचाईमुळे अराजक स्थिती !
लंडन (ब्रिटन) – सध्या ब्रिटनमध्ये प्रचंड इंधन टंचाई निर्माण झाली आहे. ब्रिटनमधील जवळपास ९० टक्के पेट्रोल पंपमधील इंधन संपले आहे. लोक पेट्रोल घेण्यासाठी धावाधाव करत असल्याने पेट्रोल पंपांवर अराजक स्थिती निर्माण झाली आहे. इंधन टंचाईमुळे खाद्यपदार्थांचाही तुटवडा निर्माण झाला आहे. या इंधन टंचाईचा परिणाम ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
British fuel crisis leads to chaos, blocked roads as people throng to petrol pumps https://t.co/Lz0GJtrdKP
— Republic (@republic) September 27, 2021
ब्रिटनमध्ये इंधन टंचाईचे मोठे कारण हे ब्रेक्झिट (युरोपियन युनियनमधून ब्रिटनने बाहेर पडणे) आणि ट्रकचालक यांची कमतरता असल्याचे सांगितले जाते. यामुळे ब्रिटनची पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. इंधन टंचाई दूर करण्यासाठी जवळपास १० सहस्र ट्रकचालकांची आवश्यकता आहे. यासाठी नवीन चालकांना प्रशिक्षण देणे आणि परवाना देण्याची आवश्यकता आहे.