५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. केतकी अभिजित ढोबळे (वय ५ वर्षे) !
भाद्रपद कृष्ण पक्ष नवमी (३०.९.२०२१) या दिवशी भोसरी (जिल्हा पुणे) येथील चि. केतकी अभिजित ढोबळे हिचा ५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त केतकीच्या जन्मापूर्वी तिच्या आईला जाणवलेली सूत्रे आणि जन्मानंतर तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
चि. केतकी अभिजित ढोबळे हिला ५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. जन्मापूर्वी
अ. ‘मी गरोदर असतांना माझ्यात ‘नामस्मरण करणे, सनातन संस्थेचे ग्रंथ आणि इतर धार्मिक ग्रंथ यांचे वाचन करणे’, यांची ओढ निर्माण झाली. हे सर्व प्रयत्न माझ्याकडून सहजतेने झाले.
आ. धार्मिक ग्रंथांचे वाचन आणि नामजप करतांना मला पोटातील गर्भाची हालचाल जाणवत असे.
२. प्रसुती
नैसर्गिक प्रसुती होणे आणि प्रसुतीच्या वेळी होणार्या वेदना नामजप केल्याने सहन करता येणे : प्रसुतीच्या वेळी बाळाच्या गळ्याभोवती नाळ असल्यामुळे आधुनिक वैद्यांनी मला ‘शस्त्रकर्म करूनच प्रसुती करावी लागेल’, असे सांगितले होते. शेवटी माझी नैसर्गिक प्रसुती झाली. त्या वेळी मला पुष्कळ वेदना होत होत्या, तरीही त्या स्थितीतही माझा नामजप सतत चालू होता. नामजपामुळेच मी एवढ्या वेदना सहन करून स्थिर राहू शकले.’
– सौ. राजश्री ढोबळे (आई), भोसरी, जिल्हा पुणे.
३. जन्मानंतर
३ अ. जन्म ते ३ मास
१. ‘बाळाचा जन्म झाल्यावर त्याच्या शरिराचा रंग निळसर दिसत होता.
२. केतकी ३ मासांची होईपर्यंत प.पू. भक्तराज महाराज यांची भजने, श्रीरामाचा नामजप किंवा पोवाडे लावल्यावर शांत झोपत असे.
३ आ. वय ३ मास ते १ वर्ष : केतकी रांगत जाऊन देवघरातील देवतांना नमस्कार करत असे.’
– सौ. सुनंदा ढोबळे (आजी (वडिलांची आई)), भोसरी, जिल्हा पुणे.
३ इ. वय २ ते ५ वर्षे
३ इ १. व्यवस्थितपणा
अ. ‘घरात कचरा दिसल्यास केतकी स्वतः झाडू आणि सुपली घेऊन येते अन् कचरा भरून कचरापेटीत टाकते.
आ. ती घरात इतरत्र पडलेल्या वस्तू उचलून योग्य ठिकाणी ठेवते.
३ इ २. प्रेमळ
अ. घरात कुणी रुग्णाईत असेल, तर ती त्याची अगदी मोठ्या माणसासारखी विचारपूस करते. तिच्या आजीने कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यावर आजीला ताप आला होता. तेव्हा केतकी आजीला धीर देऊन सांगत होती, ‘‘आजी, तू घाबरू नकोस. मी तुला रुग्णालयात घेऊन जाईन.’’
आ. एकदा तिच्या आईला पिण्यासाठी दूध शिल्लक नव्हते. तेव्हा तिने स्वतःच्या पेल्यातील दूध आईला दिले.
इ. तिच्या प्रेमळ स्वभावामुळे नातेवाईक तिच्याकडे आकृष्ट होतात.
३ इ ३. समंजस : कधी तिला बाहेर नेल्यास ती खेळणे किंवा इतर वस्तू विकत घेण्यासाठी हट्ट करत असेल आणि तिला समजावून सांगितले, तर ती तात्काळ ऐकते.
३ इ ४. अनुकरण करणे : मी ‘ऑनलाईन’ सत्संग आणि धर्मशिक्षणवर्ग घेण्याची सेवा करतो. ते पाहून ती माझ्याप्रमाणे कृती करून आजीला सांगते, ‘‘मी आता सत्संग घेत आहे. तू माझ्या समवेत प्रार्थना कर.’’
३ इ ५. केतकी प्रत्येक कृती इतरांना विचारून करते.
३ इ ६. सात्त्विकतेची ओढ
अ. ती समाजातील व्यक्तींकडे जाणे आणि बोलणे प्रकर्षाने टाळते; मात्र साधक घरी आल्यावर ती त्यांच्याशी मोकळेपणाने बोलते.
आ. ती झोपतांना अत्तर, कापूर आणि गोमूत्र आदींचे उपाय करते. ती तिच्या अंथरुणाभोवती नामपट्ट्यांचे मंडल घालते. ती माझ्या समवेत गुरुदेवांना साष्टांग नमस्कार करते. तिला या कृती करायला फार आवडतात. ती मला हे सर्व करण्याची आठवण करून देते आणि त्यासाठी मला साहाय्यही करते.’
– श्री. रघुनाथ ढोबळे (आजोबा (वडिलांचे वडील)), भोसरी, जिल्हा पुणे.
इ. ‘केतकीला बालपणापासून प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकायला आवडतात.
३ इ ७. देवाची ओढ
अ. केतकी ३ वर्षांची असतांना आम्ही सर्व जण तुळजापूरला कुलदेवतेच्या दर्शनासाठी गेलो होतो. आम्ही मंदिरात पोचल्यावर केतकी तिच्या आजोबांनी धरलेले तिचे बोट सोडून पळत सुटली आणि भवानीमातेच्या समोर जाऊन उभी राहिली. सर्व पुजारीही केतकीच्या या कृतीकडे कौतुकाने बघत होते.’
– श्री. अभिजित ढोबळे (वडील), भोसरी, जिल्हा पुणे.
आ. ‘केतकीला देवपूजा करायला आवडते. पूजा करतांना ‘देवतांना त्यांच्या कपाळावर योग्य ठिकाणी गंध लागावे’, यासाठी ती प्रयत्न करते.
इ. ती माझ्या समवेत नामजप करण्याचा प्रयत्न करते.
ई. केतकी रात्री झोपतांना पंचमुखी हनुमानाचे चित्र जवळ घेऊन झोपते आणि त्याच्याशी बोलते. एकदा तिला सर्दी झाली होती. तेव्हा ‘हनुमानाला सर्दी होऊ नये’, यासाठी तिने काही दिवस हनुमानाचे चित्र स्वतःपासून दूर ठेवले होते.
४. पू. (सौ.) संगीता पाटीलकाकू
(सनातनच्या ८५ व्या संत (पू. (सौ.) संगीता पाटील (वय ५२ वर्षे) केतकीच्या लहानपणीच तिच्याविषयी आम्हाला म्हणाल्या होत्या, ‘‘ही दैवी बालिका असणार.’’
५. श्रीकृष्णच विचार सुचवत असल्याचे केतकीने सांगणे
आम्ही कधीही न ऐकलेली वाक्ये ती बोलत असते. ‘तुला हे कुठून सुचते ?’, असे तिला विचारले, तर ती सांगते, ‘‘कृष्णबाप्पा मला सुचवतो तसे मी बोलते.’’
६. केतकीला श्रीकृष्णाविषयी आलेली अनुभूती
एकदा सकाळी केतकी श्रीकृष्णाच्या चित्रासमोर उभी राहून त्याच्याकडे पहात होती. काही वेळानंतर तिने मला सांगितले, ‘‘आजोबा, श्रीकृष्णाच्या बोटातील सुदर्शनचक्र गोल फिरत आहे आणि श्रीकृष्ण मान हालवत आहे.’’
७. स्वभावदोष
भ्रमणभाषवर कार्टून पहाणे’
– श्री. रघुनाथ ढोबळे (आजोबा (वडिलांचे वडील)), भोसरी, जिल्हा पुणे. (लिखाणातील सर्व सूत्रांचा दिनांक सप्टेंबर २०२१)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता |
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |