रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘सोनोग्राफी’ यंत्राची आवश्यकता !

साधक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना धर्मकार्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी !

‘सनातन संस्थेचा रामनाथी, गोवा येथे मुख्य आश्रम आहे. या आश्रमात राहून अनेक साधक पूर्णवेळ साधना करत आहेत. आश्रमात या सर्वांसाठी विविध वैद्यकीय सेवा निःशुल्क स्वरूपात उपलब्ध आहेत. या अंतर्गत रुग्ण-साधकांसाठी ‘सोनोग्राफी’ ही तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणे, ही आता काळाची गरज बनली आहे.

सध्या आश्रमातील रुग्ण-साधकांना ‘सोनोग्राफी’ ही तपासणी करण्यासाठी बर्‍याचदा ४ कि.मी. अंतरावरील फोंडा या शहरात अथवा २० कि.मी. अंतरावरील मडगाव या शहरात खासगी ठिकाणी पाठवावे लागते. याचा विचार करता आता रामनाथी आश्रमात ‘सोनोग्राफी तपासणी यंत्र’ उपलब्ध असणे आवश्यक आहे. यासाठी ‘कोनिका मिनोल्टा हेल्थकेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ (Konica Minolta Healthcare India Pvt. Ltd.) या आस्थापनाचे ‘एअरोस्कॅन बी १ प्रो’ (AeroScan B1 PRO) हे सोनोग्राफी यंत्र खरेदीयोग्य आहे. या यंत्राचे मूल्य अनुमाने ३ लक्ष रुपये इतके आहे.

‘सोनोग्राफी’ यंत्राच्या खरेदीसाठी जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी धनरूपात साहाय्य करू शकतात, त्यांनी कृपया खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा.

नाव आणि संपर्क क्रमांक 

सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : sanatan.sanstha2025@gmail.com

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

यासाठी धनादेश द्यावयाचा असल्यास तो ‘सनातन संस्था’ या नावाने काढावा.’

– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था. (१.९.२०२१)