३० सहस्र रुपयांची लाच घेतांना पुणे येथील तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !
लाचखोरीची कीड मुळापासून नष्ट करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात प्रामाणिक आणि राष्ट्रप्रेमी व्यक्तींची निवड करणे हाच पर्याय आहे ! जनतेमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण होण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे. – संपादक
पुणे, २९ सप्टेंबर – मृत्यूपत्र आणि हक्कसोडपत्र यांची सातबार्यात नोंद करून घेण्यासाठी ३० सहस्र रुपयांची लाच घेणार्या चर्होली येथील मारुति पवार या तलाठ्यास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २७ सप्टेंबर या दिवशी कह्यात घेतले. संबंधित काम करण्यासाठी तलाठी पवार याने तक्रारदाराकडे ५० सहस्र रुपयांची लाच मागितली होती. ४१ वर्षीय व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून दिघी पोलीस ठाण्यात पवार यांच्या विरुद्ध लाचखोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.