कोरोनाऐवजी रेबीजची लस दिल्याप्रकरणी आधुनिक वैद्या आणि परिचारिका निलंबित !
ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा ! – संपादक
ठाणे, २९ सप्टेंबर (वार्ता.) – कळवा येथील आटकोनेश्वर नगर भागात रहाणार्या ४० वर्षीय व्यक्तीला कोरोनाच्या लसीऐवजी रेबीजची लस देण्यात आली. ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रावर हा प्रकार घडला. रेबीजची लस दिलेल्या व्यक्तीची प्रकृती सध्या स्थिर आहे; पण या घटनेमुळे आरोग्य केंद्रावर त्या वेळी उपस्थित असलेल्या आधुनिक वैद्या राखी तावडे आणि परिचारिका कीर्ती रायात यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली आहे.