देशात घातपाती कारवाया घडवण्याविषयीच्या प्रकरणी संशयित आतंकवादी पुन्हा आतंकवादविरोधी पथकाच्या कह्यात !
देशाच्या तथाकथित शांतीदूतांच्या या आतंकवादी कारवायांच्या विरोधात तुकडे-तुकडे टोळी किंवा पुरस्कार वापसी टोळी यांना काय म्हणायचे आहे ? – संपादक
मुंबई – संशयित आतंकवादी झाकीर हुसेन शेख आणि रिझवान इब्राहिम मोमीन यांना आतंकवादविरोधी पथकाने पुन्हा कह्यात घेतले आहे. देशात घातपाती कारवायांच्या सिद्धतेत असलेल्या पाकिस्तानातील ॲन्थनी याच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून झाकीरच्या विरोधात आतंकवादविरोधी पथकाने ‘लुक आऊट सर्क्युलर’ लागू केले होते. त्यानंतर झाकीरला अटक करून त्याच्या विरोधात अवैध कृत्ये (प्रतिबंधक) अधिनियम, १९६७ अंतर्गत २५ सप्टेंबर या दिवशी गुन्हा नोंद करण्यात आला होता.
झाकीरच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी रिझवानला अटक केली. त्याच्या मुंब्रा येथील घराची आतंकवादविरोधी पथकाने झडती घेतली. तेथे त्यांना संशयित दस्तऐवज सापडले असून ते कह्यात घेण्यात आले आहेत. याप्रकरणी आणखी माहितीसाठी आतंकवादविरोधी पथकाला पडताळणी करायची असल्यामुळे या दोघांना पुन्हा कह्यात घेण्यात आले आहे.