शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना ‘ईडी’कडून समन्स !
४ ऑक्टोबर या दिवशी चौकशीसाठी उपस्थित रहाण्याचे आदेश !
वाशिम – वाशिम-यवतमाळ येथील शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना २९ सप्टेंबर या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’कडून) समन्स बजावण्यात आले आहे. येत्या ४ ऑक्टोबर या दिवशी चौकशीसाठी त्यांना उपस्थित रहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्ये पालट करून त्याचे आस्थापनात रूपांतर करण्यात आल्याप्रकरणी या आस्थापनाचे संचालक आणि भावना गवळी यांचे निकटवर्तीय सईद खान यांना ‘ईडी’कडून नुकतीच अटक करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण ?
भावना गवळी यांनी ५५ कोटी रुपयांचा ‘बालाजी पार्टीकल बोर्ड’ हा कारखाना २५ लाख रुपयांत घेतला आहे. किरीट सोमय्या यांनी त्यांच्या विरोधात तक्रार केली आहे.