शेतकर्‍यांना हानीभरपाई न दिल्यास विमा अधिकार्‍यांना कारागृहात टाकू ! – विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री

विमा अधिकार्‍यांचे खरे रूप ! अधिकार्‍यांना असे सांगावे लागणे चिंताजनक ! – संपादक 

मदत आणि पुनर्वसन विकासमंत्री विजय वडेट्टीवार

संभाजीनगर – अतीवृष्टीमुळे मराठवाड्यात तब्बल २० लाख हेक्टर शेतीची हानी झाली आहे. त्यापैकी ९० टक्के पंचनामेही पूर्ण झाले आहेत. विमा आस्थापनांविषयी शेतकर्‍यांकडून अनेक तक्रारी येत आहेत. या वेळी अतीवृष्टी झालेल्या भागांत हानीभरपाई न दिल्यास विमा आस्थापनांच्या अधिकार्‍यांना कारागृहात पाठवू, अशी चेतावणी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी २७ सप्टेंबर या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली. येथील विभागीय आयुक्तालयात झालेल्या बैठकीत मराठवाड्यातील हानीची माहिती घेतल्यानंतर ते बोलत होते.