सणादिवशीही राष्ट्र-धर्मासाठी वेळ देणारे युवा, हीच ‘हिंदु राष्ट्रा’ची खरी शक्ती !

श्री. हर्षद खानविलकर

‘ऑगस्ट मासात स्वरक्षण प्रशिक्षण शिकवू शकणारे प्रशिक्षक सिद्ध करण्यासाठी धर्मप्रेमी युवक आणि युवती यांच्यासाठी वेगवेगळे ‘ऑनलाईन’ प्रशिक्षण वर्ग चालू केले. हे वर्ग १० दिवसांचे होते. रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी, म्हणजे २१.८.२०२१ या दिवशी मी दोन्ही वर्गांत विचारले, ‘‘उद्या रक्षाबंधन आहे, तर वर्गाला एक दिवस सुटी हवी आहे का ?’’ त्या वेळी दोन्ही वर्गांतील सर्व युवक-युवतींनी ‘वर्ग झालाच पाहिजे. त्यात खंड पडायला नको’, असे मत व्यक्त केले.

रक्षाबंधनाच्या दिवशीही हे सर्व धर्मप्रेमी प्रशिक्षणवर्गाला उपस्थित राहिले. राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी त्यांचा त्याग पाहिल्यावर ‘हिंदु राष्ट्रा’ची खरी शक्ती असणार्‍या अशा धर्मप्रेमींच्या समवेत सेवा करण्याची संधी मला दिली; म्हणून ईश्वरचरणी माझी कृतज्ञता व्यक्त झाली.’

– श्री. हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती. (२८.८.२०२१)