भाजपच्या उमेदवाराच्या माघारीमुळे हिंगोली येथील राज्यसभेची पोटनिवडणूक विनाविरोध होणार !
मुंबई – हिंगोली येथील काँग्रेसचे नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी ४ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या वतीने रजनी पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. भाजपच्या वतीने संजय उपाध्याय यांनी अर्ज भरला होता; मात्र उपाध्याय यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे रजनी पाटील यांच्या विजयाचा, तसेच निवडणूक विनाविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपच्या उमेदवाराने अर्ज मागे घ्यावा, यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे नेते अन् विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.