‘वॉर्ड बॉय’कडून रुग्णालयाच्या ‘लिफ्ट’मध्ये २ अल्पवयीन मुलींचा विनयभंग !
पणजी, २७ सप्टेंबर (वार्ता.) – उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयातील ‘वॉर्ड बॉय’ गोविंद (वय ४७ वर्षे) याने रुग्णालयाच्या ‘लिफ्ट’मध्ये २ अल्पवयीन मुलींचा विनयभंग केला. मुलींच्या पालकांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केल्यानंतर म्हापसा पोलिसांनी ‘वॉर्ड बॉय’ गोविंद याला कह्यात घेतले. संबंधित दोन्ही अल्पवयीन मुलींच्या आईला उपचारासाठी त्या रुग्णालयात भरती करण्यात आले होते.