कोकण विभागात कृषी पर्यटनासाठी मोठी संधी ! – मनोज रानडे, कोकण विभागीय उपायुक्त
४० कृषी पर्यटन केंद्रांना संमती
नवी मुंबई – कोकण विभागात कृषी पर्यटनाला मोठी संधी आहे. सध्या ४० कृषी पर्यटन केंद्रांना संमती देण्यात आली असून ती पर्यटकांसाठी खुली केली आहेत. त्या माध्यमातून कोकणात पर्यटनासाठी मोठी संधी उपलब्ध होईल, असा विश्वास कोकण विभागीय उपायुक्त मनोज रानडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. जागतिक पर्यटनदिनानिमित्त पर्यटन संचालनालयाच्या अधिनस्त असलेले उपसंचालक (पर्यटन) प्रादेशिक कार्यालय नवी मुंबई यांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या पत्रकार परिषदेत पर्यटन विभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे, माहिती विभागाचे उपसंचालक डॉ. गणेश मुळे, कर्नाळा पक्षी अभयारण्याचे वनक्षेत्रपाल डी.एन्. राठोड उपस्थित होते.