रेल्वेच्या रुग्णालयांमध्ये सामान्य नागरिकांवरही उपचार होण्यासाठी केंद्र सरकारचा प्रस्ताव
कामगार संघटनांचा विरोध
नवी देहली – देशातील सामान्य नागरिकांनाही रेल्वेच्या रुग्णालयांमध्ये उपचार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने या संदर्भात प्रस्ताव सिद्ध करून उत्तर-मध्य रेल्वे विभागासह रेल्वेच्या सर्व विभागीय कार्यालयांना पाठवला आहे. देशभरात रेल्वेची एकूण १२५ रुग्णालये आहेत. तसेच ५८६ ‘हेल्थ युनिट’ आणि पॉलिक्लिनिक (बहुचिकित्सा केंद्र) आहेत. येथे केवळ रेल्वे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यावरच उपचार केले जातात. रेल्वे कामगार संघटनांनी या प्रस्तावाला विरोध केला आहे. ‘सामान्यांना उपचार करण्यास दिले, तर रेल्वे कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी यांना त्याचा फटका बसेल’, असे या संघटनांचे म्हणणे आहे.