जर्मनीत चान्सलर एंजेला मर्केल यांचा पक्ष पराभवाच्या छायेत
बर्लिन (जर्मनी) – जर्मनीमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये मावळत्या चान्सलर एंजेला मर्केल यांचा पक्ष पराभवाच्या छायेत आहे. विरोधी पक्ष सोशल डेमोक्रॅटिक विजयाकडे वाटचाल करतांना दिसत आहे. एंजेला मर्केल जवळपास १६ वर्षे जर्मनीच्या चान्सलर होत्या. सोशल डेमोक्रॅटिक पक्षाला २५.५ टक्के मते मिळाली आहेत, तर मर्केल यांच्या ‘सीडीयू/सीएस्यू (ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन/ख्रिश्चन सोशल युनियन) कंझरव्हेटिव्ह’ पक्षाच्या आघाडीला २४.५ टक्के मते मिळाली आहेत.
#AngelaMerkel is serving as Chancellor of #Germany since 2005 https://t.co/Mp8N6sPQ8N
— India TV (@indiatvnews) September 27, 2021