गुरुमाऊली साधकांची सर्वतोपरी काळजी घेत असल्याविषयी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. मेघशाम आंबेकर यांना आलेली प्रचीती !

श्री. मेघशाम आंबेकर

‘तपोधाम येथे आम्ही एकूण ३ साधक आहोत. १०.६.२०१६ या दिवशी पिंपळी येथील साधक श्री. महेश कात्रे हे कुटुंबियांसह वैयक्तिक कामासाठी लवेल येथे सायंकाळी ६ वाजता आले होते. ते वैयक्तिक कामे आटोपून रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास काही वेळासाठी तपोधाम येथे आले. ‘त्यांनी महाप्रसाद घेऊन जावे’, असे पू. शेट्येकाकूूंनी सांगितले. त्यांनी पू. शेट्येकाकूंनी सांगितल्याप्रमाणे महाप्रसाद घेण्याचे मान्य केले. महाप्रसाद  सिद्ध होण्यासाठी काही वेळ लागणार होता; म्हणून आम्ही दोघे (मी आणि श्री. कात्रे) पाण्याचा ‘व्हॉल्व्ह’ चालू करण्याकरता बाहेर आलो. ही सेवा पूर्ण झाल्यानंतर आम्ही मार्गावर उभे राहून मंदिरातील देवाचे दर्शन घेतले. त्याच वेळी मला विंचवाने दंश केला. मला वेदना होऊ लागल्या. आम्ही श्री. कात्रे यांच्या चारचाकीतून रुग्णालयात गेलो. उपचार घेऊन मी सकाळी येथे परत आलो.

देवाला ‘पुढे काय होणार आहे ?’, हे सर्व ज्ञात असल्याने तो कठीण प्रसंग घडण्यापूर्वीच योग्य ती सिद्धता करून ठेवतो आणि साधकांचे त्रास दूर करतो. (श्री. कात्रे यांच्या गाडीने मला रुग्णालयात जायला मिळाले आणि तपोधाम येथील साधिकांना सोबतही मिळाली.) आपली गुरुमाऊली सर्व साधकांची सर्वतोपरी काळजी घेते. त्याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता !’

– श्री. मेघशाम आंबेकर, तपोधाम (१५.६.२०१९)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक