कलियुगात स्वभावदोष निर्मूलन सर्व प्रकारच्या साधनांचा पाया !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘पूर्वीच्या युगांत साधना म्हणून नामस्मरण करायचे. त्या काळी लोक सात्त्विक असल्यामुळे त्यांना नामजप करणे शक्य असायचे. आता कलियुगात बहुतेक जण रज-तम प्रधान असल्यामुळे त्यांच्यात स्वभावदोष आणि अहं यांची तीव्रता अधिक असते. त्यामुळे त्यांना नामजप करणे कठीण जाते. यासाठी प्रथम स्वभावदोष निर्मूलन केल्यावरच साधनेचा पाया निर्माण होतो आणि त्यांना नामजप करणे शक्य होते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२.९.२०२१)