शिरोली ते सांगली रस्ता ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित’ करून तो ६ मासांत पूर्ण करणार ! – नितीन गडकरी
कोल्हापूर, २६ सप्टेंबर – रत्नागिरी-कोल्हापूर-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली ते सांगलीपर्यंतचा रस्ता हा ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित’ करावा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली. याला मान्यता देत ६ मासांत शिरोली ते सांगली रस्ता पूर्ण करण्याची ग्वाही नितीन गडकरी यांनी दिली. कराड येथील लोकार्पण आणि विविध रस्ते कामाच्या कोनशिला अनावरणप्रसंगी खासदार माने यांनी गडकरी यांना निवेदन देऊन विविध विकासकामांसमवेत चर्चा केली.