(म्हणे) ‘प्रभु श्रीराम हे केवळ भाजप आणि संघ यांचेच नाहीत, तर संपूर्ण जगाचे आहेत !’ – फारूक अब्दुल्ला, नेते, नॅशनल कॉन्फरन्स

जर असे आहे, तर भारतातील मुसलमानांनी अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मुक्त करण्याला विरोध का केला ? भगवान श्रीरामाप्रमाणेच भगवान श्रीकृष्ण आणि भगवान शिव हेही सार्‍या जगाचे आहेत, तर त्यांच्या काशी आणि मथुरा येथील मंदिरांची जागा मुसलमान हिंदूंना का सोपवत नाहीत ? फारूक अब्दुल्ला यासाठी प्रयत्न का करत नाहीत ? कि ‘श्रीराम संपूर्ण जगाचे आहे’, हे बोलणे म्हणजे ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’ आहे, असेच समजायचे का ? – संपादक

जींद (हरियाणा) – प्रभु श्रीराम हे केवळ हिंदूंचे नाहीत. ते पूर्ण जगाचे आहेत. भाजप श्रीरामावर स्वतःचा अधिकार सांगत आहे, जणू प्रभु श्रीराम केवळ त्याच्यासाठीच आहे आणि इतर कुणासाठीही नाही. प्रभु श्रीराम हे केवळ भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचेच नाही, तर संपूर्ण जगाचे आहेत, असे विधान नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी केले. ते माजी उपपंतप्रधान देवीलाल यांच्या १०८ व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित समारोहाला संबोधित करतांना बोलत होते.

फारूक अब्दुल्ला यांनी म्हटले की,

१. जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रहित केल्याच्या २ वर्षांनंतरही एकाही व्यक्तीला नोकरी मिळालेली नाही. केंद्राने काश्मीरमध्ये ५० सहस्र नोकर्‍यांचे आश्‍वासन दिले होते. तसे काहीच झालेले नाही. (स्वातंत्र्यापासूून २ वर्षपूर्वीपर्यंत ज्यांनी राज्य केले, त्यात फारूक अब्दुल्ला यांचाही समावेश आहे. त्यांनी काश्मीरसाठी काय केले, हे सांगायला पाहिजे ! – संपादक)

२. काश्मीर भारताचा भाग कधी नव्हता ? आम्ही गांधी यांचाच भारत निवडला, जिनांचा पाकिस्तान नाही. आम्ही म्हणालो, ‘आम्ही भारतात राहू आणि आम्ही भारतातच मरणार.’ (‘भारतात राहू आणि भारत अन् काश्मीर येथील अल्पसंख्य हिंदूंचा विश्‍वासघात करू’, हीच मानसिकता अब्दुल्ला कुटुंबीय आणि अन्य धर्मांध यांची राहिली आहे.  हाच इतिहास अन् वर्तमान आहे ! – संपादक)

४. अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते, ‘आम्ही मित्र पालटू शकतो; पण शेजारी नाही.’ (भारताकडे शेजारी पालटण्याचीही शक्ती आहे; मात्र इच्छाशक्तीच्या अभावामुळे ते केले जात नाही, हे भारतियांचे दुर्दैव ! – संपादक)

५. आपण आपल्या शेजार्‍यांशी भांडणे थांबवले पाहिजे. जर तुमचे शेजार्‍यांशी मैत्रीपूर्ण संबंध राहिले, तर तुम्ही समृद्ध व्हाल. आज आमचे मित्र कुठे आहेत ? नेपाळ, भूतान किंवा बांगलादेश आपले मित्र आहेत का ? आपण अफगाणिस्तानमध्ये अब्जावधी रुपये खर्च केले. आज अफगाणिस्तान आपला मित्र आहे का ? लहान भावाला समवेत घेतल्यासच घर समृद्ध होईल, हे मोठ्या भावाला समजले पाहिजे. (भारताने मित्रत्वाच्या नात्याने वागण्याचाच प्रयत्न केला; मात्र शेजारी राष्ट्रांनी विश्‍वासघात केला, ही वस्तूस्थिती आहे. हे फारूक अब्दुल्ला जाणीवपूर्वक बोलण्याचे टाळत आहेत, हे लक्षात घ्या ! – संपादक)