पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य बजावतांना मृतदेहाच्या ठिकाणी गेल्यावर जाणवलेली त्रासदायक सूत्रे

सुराज्य स्थापनेचे एक अंग : आदर्श पोलीस

पोलिसांविषयी वाचनात येणारी वृत्ते, त्यांचे चित्रपटांमध्ये दाखवले जाणारे खलनायकीकरण यांमुळे आणि अनेकदा स्वत:च्या अनुभवांमुळे पोलीस अन् समाज यात अंतर पडल्याचे दिसून येते. हे खरेतर पालटायला हवे. समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत.

– संपादक

१. पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असतांना विविध प्रेते हाताळावी लागणे आणि घटनास्थळी गेल्यावर चांगली-वाईट स्पंदने लक्षात येऊन जाणवलेले जडत्व २ – ३ दिवस टिकणे

‘पोलीस विभागात नोकरी करतांना मला हत्या, तसेच अकस्मात होणारे मृत्यू, रेल्वे आणि वाहन अपघातात होणारे मृत्यू अशा सर्व प्रकारच्या मृतांची प्रेते हाताळावी लागली. साधनेत आल्यानंतर परात्पर गुरुदेवांच्या कृपेने मला घटनास्थळी गेल्यावर तेथील वाईट आणि चांगली स्पंदने लक्षात यायची. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या ठिकाणी अतिशय दाब जाणवत असे. त्यामुळे डोके जड होणे, सारणी लिखाण करावेसे न वाटणे, असे त्रास व्हायचे. हे जडत्व २ – ३ दिवस टिकायचे.

२. एका व्यक्तीची हत्या झालेल्या ठिकाणी गेल्यावर चांगली स्पंदने जाणवणे, दीड दिवस पडून राहिलेल्या मृत व्यक्तीच्या खिशात सनातननिर्मित देवतांची सात्त्विक चित्रे सापडणे आणि त्या चित्रांमुळे प्रेताचे वाईट शक्तींपासून रक्षण झाल्याचे लक्षात येणे

एका तालुक्याच्या ठिकाणी कर्तव्यावर असतांना एका गावातील देव रहाटीमध्ये (देवस्थानच्या नावे असलेल्या भूमीच्या जंगलमय भागात) एका व्यक्तीची हत्या झाली होती. हे वृत्त समजताच आम्ही घटनास्थळी पोचलो. हत्या झालेल्याचे प्रेत देव रहाटीमध्ये जाणार्‍या पायवाटेपासून सुमारे २५ ते ३० फूट लांबवर एका झाडीत टाकलेले होते. प्रेत तेथे दीड दिवस तसेच पडलेले होते; पण तरीही तेथे चांगले आणि हलकेही जाणवत होते. तसेच त्रासदायक स्पंदने जाणवत नव्हती. प्रेताचा पंचनामा करतांना त्या व्यक्तीच्या पॅन्टच्या खिशात सनातन संस्था निर्मित गणपति, शिव आणि दुर्गा या देवतांची सात्त्विक चित्रे आढळून आली. ‘सनातनच्या सात्त्विक चित्रांमुळेच त्या प्रेताचे वाईट शक्तींपासून रक्षण झाले’, असे माझ्या लक्षात आले.’ (हे पोलीस अधिकारी साधना करत असल्यामुळे मृतदेहाच्या ठिकाणची चांगली आणि वाईट स्पंदने त्यांना लक्षात आली. यामुळे अशा परिस्थितीत ते आवश्यक ती दक्षता बाळगू शकतात. यातून पोलिसांनी साधना करण्याचे महत्त्व लक्षात येते. – संकलक)

– एक माजी पोलीस अधिकारी


हत्या प्रकरणात लोकप्रतिनिधीच्या भावाला जन्मठेपेची शिक्षा होऊनही सर्वाेच्च न्यायालयाने आरोपीला जामीन देणे !

‘मी लांजा येथे कार्यरत असतांना एके दिवशी बाजारपेठेतील एका व्यक्तीची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. येथील पोलीस निरीक्षक भ्रष्ट होते; पण त्यांनी हे प्रकरण अतिशय गांभीर्याने आणि प्रामाणिकपणे हाताळले. त्यांनी ५ आरोपींना तात्काळ अटक केली. या प्रकरणात सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली. या दोषींमधील एक आरोपी प्रतिष्ठित लोकप्रतिनिधीचा भाऊ होता. त्यामुळे त्याने दोषींच्या वतीने सर्वाेच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यानंतर दोषी जामिनावर सुटले. जन्मठेप होऊनही जामीन मिळाल्याने दोषी मोकाट आहेत.’

– एक माजी पोलीस अधिकारी

साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !

पोलीस आणि प्रशासन यांच्या संदर्भात येणारे चांगले आणि कटू अनुभव कळवा !

पोलीस-प्रशासन यांच्याविषयी आलेले चांगले आणि कटू अनुभव पुढे दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.

पत्ता : अधिवक्ता नीलेश सांगोलकर, द्वारा सनातन आश्रम, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा.

संपर्क क्रमांक : ९५९५९८४८४४

ई-मेल : socialchange.n@gmail.com