२७ सप्टेंबरपासून गोव्यात मुसळधार पाऊस पडणार ! – हवामान विभाग
पणजी, २५ सप्टेंबर (वार्ता.) – गोव्यात २७ ते २९ सप्टेंबर या कालावधीत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची (२४ घंट्यांत ६.४ सें.मी.हून अधिक) शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. बंगाल खाडीवर २४ सप्टेंबरपासून कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आणि ही स्थिती आता आणखी खालावली आहे. त्यामुळे गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.