परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील दिलेल्या छायाचित्रांच्या संदर्भात लक्षात आणून दिलेल्या चुका
‘साधकांनो, आध्यात्मिक उन्नती जलद होण्यासाठी परिपूर्ण सेवा करा !’
A Picture is worth a thousand words (एक चित्र १ सहस्र शब्दांइतके बोलके असते.), अशी एक इंग्रजी म्हण आहे. बोधचित्रे, छायाचित्रे यांमुळे लिखाण उठावदार दिसते. ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध होणारी छायाचित्रे कशी असावीत? याचे अनेक बारकावे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हाला शिकवले. छायाचित्र चांगले आणि सात्त्विक येण्यासाठी काय करावे ? यापासून ते छायाचित्रांची मांडणी सात्त्विक होण्यासाठी कशा प्रकारे रचना करावी, यासंदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हाला शिकवले. त्यांनी यासंदर्भात सखोल मार्गदर्शन करूनही आमच्याकडून झालेल्या चुका उदाहरणादाखल येथे देत आहोत.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/513580.html
– श्री. भूषण केरकर (६७ टक्के आध्यात्मिक पातळी), सहसंपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिके (१८.९.२०२१)